भारतीय खाद्य निगम
क्षेत्रीय कार्यालय (महाराष्ट्र), पाँचवी मंज़िल, राजेंद्र नगर, दत्तापाड़ा रोड, बोरीवली(पूर्व), मुंबई – 400 066
भरती प्रक्रिया - २०१७
 

फी भरण्याच्या सूचना

तुमची एकदा शैक्षणिक अर्हता Confirm झाली की तुम्हाला फी भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होतील.
१) ऑनलाईन पेमेंट गेटवे
२) एस. बी. आय. बँक चलन

ऑनलाईन पेमेंट गेटवे
१) प्राथमिक माहिती नोंदविणे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे, पुष्टी करणे (Confirmation).
२) ‘Pay Online’ हा पर्याय निवडा
३) तुमच्या अर्जामध्ये दाखवल्या प्रमाणे फी बरोबर आहे का याची खात्री करुन घ्यावी, रु. 300 + वास्तविक ऑनलाईन चार्जेस लागू होतील
४) जर तुमची फी बरोबर असेल तर ‘Pay Online’ हा पर्याय निवडा.
५) हा पर्याय तुम्हाला Payment Gateway कडे घेऊन जाईल. तुम्हाला तिथे Credit Card, Debit Card अथवा Net-banking असे पर्याय उपलब्ध होतील. त्यापैकी तुम्हाला योग्य त्या      पर्यायाची निवड करुन Payment करा.
६) तुमचे Payment पूर्ण झाल्यावर तुम्हाला Online Payment Receipt मिळेल. ती Print करुन तुमच्या जवळ जतन करुन ठेवावी. ही रिसिट तुम्हाला इंटरव्ह्यू/कागदपत्रे पडताळणीच्या      वेळी सबमिट करावी लागेल. ही प्रत तुम्ही तुमच्या सोयीनुसार नंतर देखील प्रिंट करु शकता.
७) पेमेंट नंतर तुमची अर्जाची प्रत तुमच्या लॉगीन मध्ये उपलब्ध होईल, ती प्रिंट करुन स्वत:जवळ ठेवावी.

एस.बी.आय. बँक चलन
१) प्राथमिक माहिती नोंदवणे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे, पुष्टी करणे (Confirmation).
२) ‘Challan print’ हा पर्याय निवडा.
३) तुमच्या अर्जामध्ये दाखवल्या प्रमाणे फी बरोबर आहे का याची खात्री करुन घ्यावी, रु. 300 + बँक चार्जेस रु. 50
४) जर तुमची फी बरोबर असेल तर ‘Challan Print’ हा पर्याय निवडा.
५) हा पर्याय तुम्हाला चलन Print कडे घेऊन जाईल. Challan प्रिंट करण्याआधी चलनवरील सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करुन घ्या. चलन प्रिंट केल्यानंतर तुमच्या जवळच्या        कोणत्याही एस. बी. आय. बँकेच्या शाखेमध्ये फी भरु शकता.
६) जर तुम्ही Online अर्ज आणि चलन प्रिंट आज केले असेल तर दुस-या दिवशी सकाळी 11:00 नंतर तुम्ही बँकेत फी भरु शकता. बँकेत फी भरल्यानंतर, फी भरल्याची पावती बँकेकडून      घेवून जतन करुन ठेवावी. ही रिसिट/पावती तुम्हाला इंटरव्ह्यू/कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सबमिट करावी लागेल.
७) फी बँकेमध्ये भरल्याच्या दुस-या दिवशी दुपारी 2:00 नंतर तुमच्या अर्जाची प्रत तुमच्या लॉगीन मध्ये उपलब्ध होईल. ती प्रिंट करुन घ्यावी.